प्रचितगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ‘प्रचितगड सातारा, रत्नागिरी आणि सांगली अशा तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.

संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. संभाजी महाराजांच या गावात काही महिने वास्तव्य होतं. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सभेदार म्हणुन नेमणुक केली. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत हे गाव प्रसिद्धिस आले. संभाजी महाराजांची सासुरवाडीच शृंगारपूर.

गडावर भवानीदेवीचे पडझड झालेले भग्नावस्थेतील मंदिर आहे. देवळात तीन मूर्ती आहेत. मधली मुर्ती भैरी भवानीची असून बाजूच्या दोन्ही मूर्ती भैरोबाच्या आहेत. देवळापाशी ५ तोफा ठेवलेल्या आहेत.


वाट : सांगली जिल्ह्यात हा किल्ला येत असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातुन जाणे सोयीचे आहे.
शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते.

राहण्याची सोय :-शृंगारपूर गावातील काही घरात,मंदिरात राहायची सोय होते.

जेवणाची सोय :- शृंगारपूर गावातील काही घरात जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय :-गडावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

जाण्यासाठी उत्तम :- ऑक्टोबर ते एप्रिल महिना

Video Link:

Photos :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *